मुंबईची झाली पुन्हा तुंबई; सखल भागात पाणी साचले,रेल्वे वाहतुकीवरही झाला परिणाम

mumbai

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाई झालेली नसल्याचा दावा विरोधकांनी के लेला असला तरीही मुंबईतील मोठय़ा नाल्यांतील १०४ टक्के गाळ उपसला असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मोठय़ा नाल्यांमधून पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे १०४ टक्के गाळ उपसा करण्यात आला आहे, असे पालिके चे म्हणणे आहे.मात्र पहिल्याच पावसात या दाव्याची पोलखोल झाल्याचे दिसून येत आहे.

सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून पहिल्याच पावसात मुंबतील सखल भागांसह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली असून मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळ ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.

याशिवाय कामावर निघालेल्या नोकरदारांना वाटेत अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे काही तासातच सायनच्या गांधी मार्केटमध्ये पाणी साचलं आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP