पुण्यात संततधार सुरूच, सकाळपासून मुठानदीत पाण्याचा विसर्ग

blank

पुणे : पुण्यासह धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, जोरदार पावसामुळे खडकवासला धरण साखळीत 60 टक्यांच्यावर पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे आज सकाळपासून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

सकाळी दहा वाजता 2 हजार क्यूसेकने सोडण्यात येणारे पाणी, दुपारी तीनच्या सुमारास 9 हजार क्यूसेकपर्यंत वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यँत सर्व धरणांतील पाणीसाठा हा 17,42 ( 59,76 टक्के) झाला आहे.

‘स्मार्ट सोडा.. इथल्या रस्त्यावर खड्डे चुकवून गाडी चालवायला आर्ट लागतं’

नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपात्रात वाढ