उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी 5 दिवस कायम राहण्याची शक्यता

पाऊस

 पुणे – बंगालच्या उपसागरात उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडीशाच्या तट वरती क्षेत्रात कमी दाबाचा निर्माण झाल्याने , संपूर्ण राज्यात जोरदार पाउस पडत आहे . या पार्श्वभूमीवर आगामी २४ तासात तटवरती दोन जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा तसच पूर स्थिती निर्माण होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ओडिशातील ८ जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातला पावसाचा जोर अपेक्षेप्रमाणे वाढला आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हा जोर आणखी 5 दिवस कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात काल सकाळपर्यंतच्या 24 तासात माथेरान, पालघर, ठाणे, सातारा, महाबळेश्वर, नाशिक, पुणे, आणि चंद्रपूर इथं 70 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

राज्यात सर्वाधिक 140 मिलिमीटर पावसाची नोंद माथेरानमध्ये झाली आहे. मराठवाड्यातला पावसाचा जोरही आज वाढेल. इतर भागात कालच्या सारखाच दमदार पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते. आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि उद्या कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणसाठ्यामध्ये पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणातील ही पातळी नियंत्रित करण्यासाठी २५ हजार क्युसेक्स इतका विसर्ग कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधल्या नागरिकांना सांगली जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :