मराठवाड्यात सर्वत्र पाऊस, ३२ तालुक्यात अतिवृष्टी

Rain In Marathwada

औरंगाबाद : दीर्घकाळ दाडी मारल्यानंतर पावसाने मराठवाड्यात शनिवारपासून जोर धरला असून तब्बल ३२ तालुक्यात व १७० पंचायत मंडळात अतिवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. पाथरवाला बुद्रुक येथील बंकट लक्ष्मण जाधव हा पुरात आज रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाहून गेल्याचे वृत्त आहे. परभणी जिल्ह्यात दोन बहिणींचा पुरात वाहून गेल्या मृत्यू झाला. तर पूर्णा येथे भिंत अंगावर पडून महिलेचा झोपेतच मृत्यू झाला. खरीपाची पिके बहुतांश हातातून गेली आहेत. जेथे मूग काढणीला आले होते तेथे या पावसाने नुकसान झाले आहे. मात्र या पावसाने भूगर्भातील पाण्याची पातळी आणि ओल वाढली असून रबी हंगामासाठी अत्यंत उपयुक्‍त ठरणार आहे. काल दुपारपासूनच मराठवाड्याच्या सर्व भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली. मराठवाड्यात ३२ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये पुर्णा – ६७, नांदेड १५६, मुखेड १९९, अर्धापूर १२२, भोकर ९९, उमरी १३०, कंधार ८५, लोहा ९८, देगलूर ६५, बिलोली १०८, धर्माबाद १२६, नायगाव १३४, मुखेड ११६ मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे नांदेड शहरात गेल्या २४ तासात विक्रमी १४४ मिमी पावसाची नोंद झाली असून महानगरपालिका आयुक्‍त आणि अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या घरात पाणी शिरले आहे. मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद अशा सर्व आठही जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील जिल्हाशः चोवीस तासातील पावसाची आकडेवारी याप्रमणे औरंगाबाद – ३५, जालना – ३२, परभणी – ४२, हिंगोली – ४४, नांदेड – १००, बीड – ६८, उस्मानाबाद – १३३, लातूर – १००. मिळालेल्या या आकड्यांपेक्षाही प्रत्यक्षात जास्त पाऊस झाला असल्याची शक्यता आहे.मराठवाड्याच्या विविध भागातून पावसामुळे घडलेल्या घटना या प्रमाणे आहेत. मुखेडचा नांदेड सह इतर तालुक्याशी संपर्क तुटला. मुदखेड शहर जोडणारे प्रमुख राज्य व प्रमुख जिल्हा रस्त्यावर नदी नाल्याचे गेली पाच तासांपासून वाहत आहेत. धर्माबाद येथील तहसिल व भुमीअभिलेख कार्यालयाला पावसाच्या पाण्याने वेढले आहे. परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातील पारवा येथे पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने आम्रपाली येवले(१२) आणि किर्ती येवले (१९) या दोन चुलत बहिणी वाहून गेल्या. दोघींचे मृतदेह सापडले. पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे अंगावर भिंत पडल्याने पद्मिन चंद्रकांत गायकवाड ( ५८) या महिलेचा झोपेतच मृत्यू झाला. पावसामुळे रचलेली भींत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली.लातूर जिल्ह्यात देवणी येथे काल दुपारपासून सुरु झालेल्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले. मुख्य पीक सोयाबीनला याचा अधीक फायदा होणार आहे. तर काढणीस आलेल्या मुग उुडीद या पिकास या पावसाचा फटका बसणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे लहान-मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसामुळे गंगाखेड बस स्थानकाला गळती लागली असून बस स्थानक परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे. जळगाव ते औरंगाबाद महामार्गावर धुके खूप आहे. पाचोडजवळ वीज कोसळली. बीड जिल्ह्यात अनेक पंचायत मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

Loading...

अतिवृष्टी झालेले महसूल मंडळे : बीड, राजुरी न, पेडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, पिंपळनेर, पाली, लिंबागणेश, पाटोदा, थेरला, अमळनेर, दासखेड, आष्टी, कडा, धामणगाव, टाकळसिंग, गेवराई, धोंडराई, उमापूर, जातेगाव, शिरूर, रायमोह, तींतरवणी, अंबाजोगाई, घाटनांदूर लोखंडी सावरगाव, बर्दापुर, विडा, ह.पिंपरी, बनसारोळा, नांदूरघाट, धारूर, परळी, सिरसाळा. बीड जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस याप्रमाणे बीड -७४.८२ मि. मी, पाटोदा- ९७.५०, आष्टी- ६२.८६, गेवराई – ६९.२०, शिरूर का. -८२, वडवणी- ५९, अंबाजोगाई- ७५, माजलगाव- ५१, केज- ६५.८६, धारूर- ५७, परळी- ५८.४० हवामान खात्याने १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्टपर्यत मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याचे अंदाज चुकत असतांना हा अतिवृष्टीचा अंदाज खरा ठरला आहे.मराठवाड्यात १७० मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद ०५, जालना ०३, परभणी ०४, हिंगोली ०४, नांदेड ५६, बीड ३४, लातूर ४७, उस्मानाबाद १६ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यातही मुदखेड तालुक्यातल्या बारड मंडळात २०४, मुदखेड २०१ आणि मुगट १९१ मिमी पाऊस झाला आहे.Loading…


Loading…

Loading...