टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा पावसामुळे रद्द झाली आहे. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून याबाबत माहिती दिली आहे. काल पासून पुण्यात पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे ज्या सभा स्थळावरून सभेला संबोधित करणार होते ते मौदनात ही चिखल झाला आहे. तसेच आज सायंकाळी सुरु झालेल्या पावसामुळे सभा स्थळाची अवस्था खूपच बिकट झाली. त्यामुळे राज ठाकरे यांची पहिलीचं सभा रद्द झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आज पहिली सभा होणार होती. यावेळी राज ठाकरे आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार होते. मात्र अवकाळी पावसाने राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेतचं विघ्न आणले आहे.
पुण्यात सुरु असलेल्या वादळी पावसामुळे आज ९ ऑक्टोबर २०१९ रोजी सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणात होणारी राजसाहेबांची सभा रद्द करण्यात आली आहे. कृपया ह्याची नोंद घ्यावी. https://t.co/1AkU1cnSzG
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 9, 2019