राज्यातील पावसाची स्थिती जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

टीम महाराष्ट्र देशा- जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्यानं देशाच्या अनेक भागांना दिलासा मिळाला असून, एकंदर पाणीटंचाई कमी झाली आहे. येत्या दोन आठवडयात असाच चांगला पाऊस अपेक्षित असल्यानं पाणीटंचाईची स्थिती आणखी सुधारेल, असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

जुलैमधे, २८५ मिलिमीटरच्या सरासरीपेक्षा जास्त, म्हणजे २९८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. महाराष्ट्रासह बिहार, असमच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात रात्रभर संततधार सुरू होती. कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातली आळंदी, वालदेवी आणि भावली ही तीन मध्यम धरणे शंभर टक्के भरली आहेत. गंगापूर आणि दारणा धरणांचा साठा सुमारे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गंगापूर धरणातून सध्या पाच हजार तीनशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती फक्त एका क्लिकवर

पावसाच्या हुलकावणीने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; यंदा पाऊस लावणार दमदार हजेरी

देशात विविध भागात पूरपरिस्थिती, महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोरडाच