पाऊस पुन्हा सक्रीय होणार !

rain maharashtra

पुणे : राज्याला गेल्या पंधरा दिवसांपासून ओढ दिलेला पाऊस गुरुवारपासून पुन्हा सक्रीय होईल. येत्या १८  ते २२ ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात चांगला पाऊस होणार आहे, असे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे.मान्सून सक्रीय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पश्चिम बंगाल आणि बंगालच्या उपसागरात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्तिथी निर्माण झाली आहे. या बदलामुळे पावसाचा जोर वाढेल. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यामध्ये येत्या १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले. येत्या दोन दिवसात विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.