‘पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात अन् मलईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात !’

मुंबई : पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावरील रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली असून मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. याशिवाय कामावर निघालेल्यानोकरदारांना वाटेत अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. जोरदार झालेल्यापावसामुळे काही तासातच सायनच्या गांधी मार्केटमध्ये पाणी साचलं आहे. सायन, किंग्जसर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. सायनमध्येअनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याने भाजपने शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, अशा काव्यमय शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली. हे काव्य करताना महापालिकेत 5 वर्षात 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

शेलार यांनी ट्विट करून पालिकेच्या भ्रष्ट कारभारावरच बोट ठेवले आहे. ‘मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले आहे. घरात पाणी घुसू लागले आहे. नालेसफाई कधी 107% तर कधी 104% झाल्याच्या दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने ‘वाझे’. पहिल्या पावसातच ‘कटकमिशन’चे सगळे व्यवहार उघडे पडले आहेत. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा. पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा,’ अशी काव्यात्मक टीका शेलार यांनी केली आहे. ‘डेब्रिजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात, पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात!,’ अशी टीका करतानाच आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेनं केलेले सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरले असून मुंबई शिवसेनेनं तुंबवून दाखवली, असल्याची टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत अजिबात पाणी तुंबणार नाही, असा दावा कधीच केला नव्हता, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP