नाशकात पावसाचे घुमशान

nashik

 

वेबटीम : पावसाळा सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती, मात्र. मध्यंतरी पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता . आता प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात  पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो…धो बरसला. नाशिक जिल्ह्यात तर पावसाचे अक्षरश: धुमशान घातले असून गोदावरीला पूर आला आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पाऊस झाला. लोणावळ्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे. दुबार पेरण्यांचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून कोसळधार सुरू आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात १९३ मि.मी. एवढा झाला. त्या खालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. चालू मोसमात गोदावरीला पहिल्यांदाच पूर आला. शुक्रवारी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले होते.