टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या विविध ठिकाणी परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. राज्यभरात शेतकरी आपली कामे करत असताना शेतीतील कामात अडथळा आता पावसाने निर्माण केला आहे. सध्या परतीच्या पावसाचा काळ चालू असल्याने शेतकरी आपल्या हाता तोंडाशी आलेल्या पिकासाठी चिंतेत आहे. विविध भागात सोयाबीन, कापुस आणि फळबागांना फटका बसत आहे.
मराठवाड्यात पावसाचा जोर कायम
मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम चालू आहे. अशात शेतात सोयाबीन काढणी चालू असताना काढून टाकलेले सोयबीन शेतकऱ्यांना गोळा देखील करता आलेले नाही. मोठ्या प्रमाणात पावसाने सोयाबीन उत्पादकांचे नुकसान केले आहे. कापुस पिक धारकांचे देखील नुकसान सध्या होत आहे.
परभणी, नांदेड, लातूर या भागात मुसळधार पाऊस कोसळलेला आहे. तर विदर्भात बुलढाणा भागात जनजीवन विस्कळीत करण्यासारखा पाऊस झाला आहे.
राज्यात पावसाचा जोर काही भागात कमी झाला असला तरी काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुणे, नाशिक सोलापुर, बुलढाणा या भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
आजही हवामान खात्याकडून भंडारा, गोंदिया, नागपुर आणि वर्धा जिल्हे सोडून इतर भागात यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी शेतातील कामे करताना काळजी घेण्याची गरज आहे. त्याचबाबरोबर हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंचा गाजलेला ‘तो’ किस्सा
- India vs Pakistan महामुकाबला सुरू! पाकिस्तानने घेलता प्रथम फलदांजीचा निर्णय
- Chitra Wagh | “शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- MNS | शिंदेंनी दर्शन न घेतल्याने देवीचं विसर्जन थांबवलं ; “देवापेक्षा CM मोठे झाले का?”; मनसेचा सवाल
- MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू