टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाने Rain थैमान घातले आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी देखील मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. तर दुसरीकडे अहमदनगर, नाशिकमध्ये देखील परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. दरम्यान, आज राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर 22 ऑक्टोबर पासून म्हणजेच उद्यापासून मुंबई आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात सूर्यप्रकाश दिसण्याची शक्यता असून पावसाची उघडीप होण्याचे अंदाज देखील माणिकराव खुळे यांनी वर्तवले आहे.
राज्यात परतीच्या पावसाची Rain उघडीप
ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह कोकणात रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी तुरळक पावसाची शक्यता आहे. तर, 22 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रात पावसाची उघडीप होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात परतीचा मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे असेही अंदाज हवामान खात्याने दिले आहे. त्यामुळे आता राज्यात दिवाळी दरम्यान पावसाची उघडीप होण्याची शक्यता आहे.
परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी सापडला संकटात
सध्या राज्यातील शेतकऱ्याचा खरीप पिक काढण्याच्या हंगाम सुरू असून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याची उभ्या पिकांची नासाडी झाल्याचे दिसत आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याचे चित्र समोर येत आहे. शेतीतील मका, सोयाबीन, मूग फळबागा इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून आज राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्याला दिलासा देत उद्यापासून पावसाची उघडीप होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.
पुण्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ
राज्यात गेले अनेक दिवस परतीच्या पावसाची धूम सुरू आहे. दरम्यान, पुणे शहराला परतीच्या पावसाने चांगलचं झोडपल्याचं चित्र समोर येत आहेत. पुण्यात गेल्या अनेक दिवस परतीच्या पावसाने थैमान घातलेल्या असून नागरिकांना त्यामुळे मोठे झाले आहेत. रस्त्यावर जागोजागी पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील झाली आहे. अशा परिस्थितीत आज हवामान खात्याकडून पावसाची उघडीप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Arvind Sawant | “मग तेव्हा तमाशा का करता?”; देवेंद्र फडणीसांच्या ‘त्या’ वक्तव्याला अरविंद सांवतांनी दिले प्रत्युत्तर
- Corona Alert | “कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते “; WHO चा इशारा
- Ramdas Athavle | शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, रामदास आठवले म्हणाले…
- Rupali Thombre | चंद्रशेखर बावनकुळे यांना हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज – रुपाली ठोंबरे
- Uddhav Thackeray | “कोणाला तरी उभा करून विनंती करवून घेतली”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर पलटवार