दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. लातूरकडे वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकरी हैराण झाले होते.

तसेच लातूर जिल्ह्यात पावसाळा संपला तरी दमदार पावसाची एंट्री झालीच नाही, मात्र गेल्या दोनच दिवसांत परतीच्या दमदार पावसामुळं सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे. कोरड्या ठाक पडलेल्या नद्या आता खळखळून वाहू लागल्यात. त्यामुळं लातुरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

सांगली जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम भागातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी तालुक्यातील नद्यांनाही पूर आलाय.

दुष्काळी माण तालुक्यात मोठ्या प्रमाण परतीचा पाऊस झाला. त्यामुळे या भागातील माणगंगा नदीला मोठा पूर आलाय. या पावसामुळे आंधळी धरण देखील ओव्हरफ्लो झालंय.

महत्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...