‘पावसाला एक अक्कल नाही, नेहमी जास्त पडून मुंबईची तुंबई करतो’ ; केदार शिंदेंची बीएमसीवर जोरदार टीका

bmc

मुंबई : पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावरील रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली असून मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. याशिवाय कामावर निघालेल्यानोकरदारांना वाटेत अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. जोरदार झालेल्यापावसामुळे काही तासातच सायनच्या गांधी मार्केटमध्ये पाणी साचलं आहे. सायन, किंग्जसर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. सायनमध्येअनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याने मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत मुंबई बीएमसीला चांगलेच सुनावले आहे. ते ट्विट करत म्हणाले, ‘पावसाला एक अक्कल नाही. ५० मी मी पर्यंत संरक्षणाची व्यवस्था बीएमसीने केली होती. हा नेहमी जास्त पडून तुंबई करतो.’ अशा आशयाचे ट्विट करात त्यांनी बीएमसीवर जोरदार टीका केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

IMP