fbpx

… तर रेल्वेकडून मिळणार नुकसानभरपाई

indian-railway

नवी दिल्ली – ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, रेल्वे प्रशासनाला त्या व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई द्यावीच लागेल, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान अपघात झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळविण्याचा पूर्ण अधिकार असून, प्रवाशाचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असल्याचं सांगून रेल्वे प्रशासन जबाबदारी झटकू शकत नसल्याचं देखील कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं.

सुप्रीम कोर्टात न्या. ए के गोयल आणि न्या. आर एफ नरिमन यांच्या खंडपीठासमोर रेल्वे मंत्रालयाच्या याचिकेवर सुनावणी झाली. रेल्वे कायदा 1989त्या सेक्शन 124A अंतर्गत आत्महत्या किंवा आजारपणामुळे होणारे मृत्यू किंवा स्वतःला इजा पोहोचवण्याच्या दृष्टीने घडलेले प्रकार याला अपवाद असतील, अशा प्रकारांमध्ये भरपाई मिळणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

प्रवाशाकडे तिकीट नाही म्हणून एखाद्या प्रवाशाला रेल्वे प्रशासन भरपाई नाकारु शकत नाही. पण, भरपाईचा दावा सिद्ध करण्यासाठी प्रवासासंदर्भातील अन्य पुरावे सादर करणे गरजेचं असेल. अपघात हा प्रवासादरम्यान होऊ शकतो किंवा प्रवासानंतर ट्रेनमधून उतरतानाही होऊ शकतो. स्टेशन परिसरात होणाऱ्या अपघातांमध्ये रेल्वे प्रशासनाला भरपाई द्यावी लागेल, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

1 Comment

Click here to post a comment