रेल्वेभरती परीक्षेची वयोमर्यादा वाढवली

indian-railway

टीम महाराष्ट्र देशा- विविध पदांवरील नोकरभरतीसाठीची कमाल वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये यासंदर्भात मोठ्याप्रमाणावर आंदोलन करण्यात आले होते. रेल्वेभरतीची परीक्षा देण्यासाठी मल्याळम, तामिळ, कन्नड, ओडिया, तेलुगू, बांगला आणि अन्य प्रादेशिक भाषांच्या माध्यमातून देण्याचा पर्यायही खुला करण्यात आला आहे.

अशी असेल नवीन वयोमर्यादा

लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट या पदांवरील भरतीसाठीची कमाल वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गासाठी सध्याच्या २८ वर्षांवरून ३० वर्षे
ओबीसी प्रवर्गासाठी ३१ वर्षांवरून ३३ वर्षे
अनुसूचित जाती-जमातींसाठी ३३ वर्षांवरून ३५ वर्षे

गट ड साठीची कमाल वयोमर्यादा

खुल्या वर्गासाठी २८ वरून ३० वर्षे
ओबीसींसाठी ३४ वरून ३६ वर्षे
अनुसूचित जाती, जमातींसाठी ३६ वरून ३८ वर्षे 

रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात गट क (आधीचा गट ड) मधील ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समॅन, हेल्पर, गेटमॅन, पोर्टर आणि गट क लेव्हल २मधील असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ (फिटर, क्रेन ड्रायव्हर आदी) वगैरे ९० हजार पदांसाठी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. ही परीक्षा मल्याळम भाषेतून घेण्याची मागणी केरळमधील आंदोलकांनी केली होती, तर कमाल वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी बिहारमध्ये हिंसक आंदोलन झाले होते.Loading…
Loading...