Railway: रेल्वेची नवी कॅटरिंग पॉलिसी जाहीर

                     रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कॅटरिंग धोरणाची माहिती देताना सांगितले की, या नव्या धोरणानुसार आयआरसीटीसीकडे कॅटरिंग व्यवस्था सांभाळण्याची जाबाबदारी दिली आहे. तर रेल्वेमध्ये खराब जेवण मिळण्याच्या प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन, रेल्वे प्रवांशांना जेवण पोहोचवण्याची जबाबदारी देखील आयआरसीटीसीचीच असेल.
  •  आता रेल्वेमध्ये जेवण तयार केले जाणार नाही. तर ट्रेनच्या पँट्री कारमध्ये केवळ बेस किचनमध्ये बनवण्यात आलेलं जेवण गरम करण्याची व्यवस्था असेल.
  •  जेवण तयार करण्यात येणाऱया  बेस किचनवर आयआरसीटीसीचे नियंत्रण असेल.
  •  नव्या धोरणानुसार फूड चेन कंपन्यांनाही जोडले जाणार आहे.
  •  रेल्वेमध्ये जेवण पुरवण्यासाठी यापुढे लायसेन्स दिले जाणार नाही. त्यामुळे जुन्या ट्रेनमध्ये जेवण पोहोचवण्याची खासगी कंत्राटदारांची मुदत संपल्यानंतर त्याचीही जबाबदारी आयआरसीटीसीकडेच येईल.
  •  नव्या कॅटरिंग पॉलिसीमध्ये कंत्राट वाटपात महिलांना 3 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व रेल्वे स्थानकांवर 33 टक्के स्टॉल्स हे महिलांसाठी राखीव असणार आहेत.
  •  रेल्वेचे सर्व बेस किचन हे झोनल रेल्वेच्या अधिकाराखाली नियंत्रित असतील. त्यात रेल्वे पँट्रीकार सेवा पुरवण्याचे कामही आयआरसीटीसीकडे असणार आहे.
  •  ए-1 आणि प्रथम श्रेणीतल्या रेल्वे स्टेशनवरील जन-आहार, फूड प्लाझा आणि फूड कोर्टची जबाबदारीही आयआरसीटीसीकडेच असेल.
  •  कॅटरिंग सेवेत स्वयंसेवी महिला बचत गटांना जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.