Share

Railway Recruitment | भारतीय रेल्वे मध्ये 6 हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

टीम महाराष्ट्र देशा: रेल्वे परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय रेल्वे एक मोठी संधी घेऊन येत आहे. या भरती प्रक्रियामध्ये उमेदवारांची परीक्षा न घेता, थेट 10वीच्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. भारतीय रेल्वे अप्रेंटिस पदांसाठी तब्बल 6265 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवत आहे.

भारतीय रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदांसाठी तब्बल 6265 रिक्त पदांची भरती

भारतीय रेल्वे अप्रेंटिस पदांसाठी तब्बल 6265 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवत आहे. यामध्ये दक्षिण रेल्वेमध्ये 3150 तर उत्तर रेल्वेमध्ये 3115 पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार भारतीय रेल्वेच्या या http://secr.indianrailways.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळू शकता.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 % गुणांसह 10 वी पास असावा. त्याचबरोबर इच्छुक उमेदवाराकडे ‘नॅशनल ट्रेन सर्टिफिकेट’ असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्ष असावे. यामध्ये अपंगांसाठी वयोमर्यादेत 10 वर्षाची सूट, तर OBC वर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष आणि SC/ST साठी 5 वर्षांची सूट आहे.

भरती प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांची डॉक्युमेंट वेरिफिकेशनच्या आधारे निवड केली जाईल. त्यानंतर त्यांच्या सरासरी गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया केली जाईल.

अर्ज फी

भारतीय रेल्वेच्या अप्रेंटिस पदांसाठी इच्छुक उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावी लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या पदांसाठी इच्छुक उमेदवार http://secr.indianrailways.gov.in या भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 31 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी http://secr.indianrailways.gov.in भारतीय रेल्वेच्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर मेन विंडो उघडल्यावर उमेदवाराला संबंधित लिंक वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर उमेदवारांनी आपली माहिती प्रविष्ट करावी.
  • माहिती प्रविष्ट केल्यानंतर उमेदवारांना आपला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर इत्यादी प्रविष्ट करावे लागेल.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट केल्यानंतर उमेदवारांना आपला स्कॅन केलेला फोटो, सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करावे लागेल.
  • नंतर अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावे लागेल.
  • फॉर्म सबमिट झाल्यावर उमेदवाराला फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी लागेल.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: रेल्वे परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय रेल्वे एक मोठी संधी घेऊन येत आहे. या भरती प्रक्रियामध्ये उमेदवारांची …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now