रेल्वेमंत्र्यांनी देऊ केला राजीनामा मात्र…

वेबटीम : रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सोपवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्याप प्रभू यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. मोदींनी प्रभूंचा राजीनामा ‘वेटिंग’वर ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘थोडं थांबा,’ असं सांगत प्रभू यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे.

आठवडाभरात लागोपाठ दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यावर टीका होत होती.उत्तर प्रदेशातील औरेया येथे आज पहाटे कैफियत एक्सप्रेसचे आठ डब्बे रेल्वे रूळावरून घसरले. या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी ७४ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची जबाबदारी स्वीकारून सकाळीच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी देखील दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या अपघाताची जबाबदारी स्विकारत मोदींकडे मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. मात्र मोदी यांनी हा राजीनामा तुर्तास फेटाळून लावला आहे. स्वत: प्रभू यांनीच टि्वटरवरून ही माहिती दिली.