रेल्वे परिसरात अनधिकृतरित्या प्रवेश करणा-या पाच हजार लोकांवर कारवाई

railway

पुणे: पुणे रेल्वे मंडळाच्या वतीने मंडळाच्या कार्यकक्षेतील रेल्वे स्थानकांवर अनधिकृतरित्या प्रवेश करणा-या तसेच रेल्वे लाईन ओलांडणा-या 5849 नागरिकांवर पुणे रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर, 2017 मध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृतरित्या प्रवेश करणा-या नागरिकांवर केलेल्या कारवाईत सहा लाख 52 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलकडून करण्यात आली आहे.

रेल्वे परिसरात प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच प्रवेश करावा. तसेच अनधिकृतपणे रेल्वे लाईन ओलांडणे जोखमीचे असल्याने असा प्रकार नागरिकांनी करू नये. असे करताना आढळल्यास संबधित नागरिकांवर आर्थिक दंड व कैद अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे, आवाहन मंडळ सुरक्षा आयुक्त डी. विकास यांनी केले.