डुप्लीकेट का बदला डुप्लीकेट से ?, रायगडमध्ये शिवसेनेच्या अनंत गीतें विरोधात ‘अनंत गीते’

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे, युती आणि आघाडीमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात मतदान असणाऱ्या मतदारसंघात बहुतांश उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, काही ठिकाणी प्रमुख पक्षाच्या उमेदवाराच्या नावाशी मिळते जुळते नाव असलेले डमी उमेदवार उभे करण्याचं राजकारण केलंं जात आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अनंत गीते हे लढणार आहेत, तर आणखीन एका अनंत गीते नावाच्या व्यक्तीने अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना अशाच एका अपक्ष सुनील तटकरेचा फटका बसला होता. त्यामुळे मागील निवडणुकीतील वचपा काढण्यासाठी तटकरे यांनीच दुसऱ्या अनंत पद्मा गीतेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्याची चर्चा सुरु आहे.

२०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचा २११० मतांनी पराभव झाला होता, तर अपक्ष म्हणून लढलेल्या सुनील तटकरेंना नऊ हजारांच्या आसपास मतदान मिळाले होते. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभा राहिलेल्या अनंत पद्मा गीतेमुळे शिवसेनेच्या गीतेंना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.