fbpx

रायगड रांगडा आहे आणि तो रांगडाच राहील ; खा.छत्रपती संभाजीराजे

chtrapati sambhaji

कोल्हापूर: कोरेगाव भीमा दंगलीनंतर संभाजी भिडे याचं नाव चर्चेत आहे. संभाजी भिडे यांची ओळख एक प्राध्यापक, समाजसेवक तर आहेच. नवीन म्हणजे भिडे यांनी रायगडावर ३२ टन सोन्याच सिहांसन बसवण्याचा संकल्प केला आहे. मात्र त्यासाठी प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल. अमुक एकाच्या मनात आले म्हणून काही होणार नाही, तर प्राधिकरणाच्या कठोर चाचणीनंतरच एकेक गोष्ट पुढे सरकेल. असे मत खासदार व रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी (बुधवारी) पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते.

Raigad

काय म्हणाले खासदार छत्रपती संभाजीराजे  

रायगड रांगडा आहे आणि तो रांगडाच राहील. रायगडची अवस्था राजस्थानच्या किल्ल्यासारखी करायची नाही. रायगडच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता पुर्नबांधणी होईल यासाठी सहाशे कोटींची निधी मंजूर आहे. रायगडचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) गडबडीत सादर झाला तरी त्यात तात्कालिक परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. गडाबरोबर लगतच्या गावांचा विकास महत्त्वाचा आहे. रायगडच्या परिक्रमेत २१गावे मोडतात. नव्याने ८८ एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. रायगड हा मॉडेल फोर्ट ठरेल; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांचाही इतिहास समोर यावा, यासाठी शिवसृष्टी साकारण्याचा विचार आहे. प्राधिकरणात पुरातत्त्व खात्यापासून तज्ज्ञांचा समावेश आहे.