दैनिक भास्करच्या कार्यालयांवर छापेमारी ; अनुराग ठाकूर म्हणाले…

anurag

मुंबई : देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक असलेल्या दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या विविध कार्यालयांवर आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी कारवाई केली. या कार्यालयांची झाडाझडती केली आहे.

रात्री अडीच वाजल्यापासून कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले असल्याची माहिती आत समोर आली आहे. दैनिक भास्कर वृत्तपत्राच्या आवारात आयकर विभागाच्या छाप्यांसंदर्भात सरकारने सांगितले की, एजन्सी आपले काम करते आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. तसेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ‘आयकर विभागाच्या छापेमारीवर काही बोलू शकत नाही. सरकारचा यात हस्तक्षेप नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच या विषयावर काही वक्तव्य केलं पाहिजे.’ असे मत त्यांनी वुक्त केले आहे.

दरम्यान इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार, दैनिक भास्करच्या ज्येष्ठ संपादकाने सांगितले की, जयपूर, अहमदाबाद, भोपाळ आणि इंदौर कार्यालयात या ग्रुपच्या छापे टाकण्यात आले. उत्तर प्रदेश टेलिव्हिजन चॅनल, भारत संवाद यांच्यावरही छापेमारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकरच्या पथकाने कर दस्तऐवजांची तपासणी करण्यासाठी लखनऊ कार्यालय आणि संपादकाच्या घराची झडती घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP