आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापे

कार्ती चिदंबरम यांनी सर्व आरोप फेटाळले

नवी दिल्ली: एअरसेल- मॅक्सिस केसच्या मनी लाँडरिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नई आणि दिल्ली येथील घरावर व तीन कार्यालयांवर छापे मारले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल साडे तीन तास त्यांच्या घरात शोधकारवाई केली. ११ वाजेपर्यंत ही शोधकारवाई सुरू होती. या छाप्याच्या वेळी ईडीच्या हाती काहीच लागले नसल्याचा दावा कार्तीच्या वकिलांनी केला आहे.

कार्ती चिदंबरम यांना तपास अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला हजर राहण्याची नोटिस दिली होती. ती कार्ती चिदंबरम यांनी घेतली नाही. ईडी कडून माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने आयएनएक्स मीडियाच्या डायरेक्टरांविरुध्द आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. आणि पिटर मुखर्जी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कार्ती चिदंबरम यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणी ईडीने आता कार्ती चिदंबरम यांना १६ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले आहे.

You might also like
Comments
Loading...