अवैध गॅस रिफिलींग सेंटरवर छापा, दोन लाख ९३ हजाराचे साहित्य जप्त

औरंंगाबाद : वळदगाव शिवारातील अवैध गॅस रिफिलींग सेंटरवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा मारुन दोन लाख ९३ हजाराचे साहित्य जप्त, कार व रिक्षा जप्त केली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी बुधवारी (दि.९) दिली.

वळदगाव शिवारात अवैध गॅस रिफिलींग सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, गुन्हेशाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या पथकाने छापा मारला.

या छाप्यात घरगुती गॅस सिलेंडरमधून इलेक्ट्रिक मोटार, बॅटरीवर चालणा-या मोटार, वजन काटे, कार, रिक्षा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी बिलाल जलाल शेख (वय ३५, रा. लिंबेजळगाव, ता. गंगापूर), गजानन मच्छिंद्र गायकवाड (वय ३०. रा. सम्राट शाळेजवळ, पंढरपूर) आणि रिक्षा चालक शेख अश्पाक शेख शेख सादीक (वय ३८, रा. कमळापूर, रांजणगाव शेणपुंजी) यांना अटक केली. याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP