सावधान तुम्ही भेसळयुक्त तुप तर खात नाही ना?

pune adeltration raid by fda

पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरात गोकुळनगर येथे तुपात होणाऱ्या भेसळीचा भांडाफोड करण्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाला यश आलं आहे.भेसळीच्या विरोधात करण्यात आलेली ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोंढवा भागातील गोकुळनगर येथे तूपामध्ये भेसळ होत असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यांनी रविवारी पोलिसांच्या मदतीने येथे छापा टाकला.प्रशासनाने लाखो लिटर बनावट तूप जप्त केले आहे.

अक्षरशःतेल मिक्स करून पुणे आणि आसपासच्या परिसरात याची गावरान तूप म्हणून विक्री होत केली जात होती. देशभरात गावरान तुपाला मोठी मागणी आहे . मात्र गावरान तुपाच्या नावाखाली सुरू असणारा हा गोरख धंदा प्रशासनाच्या  सतर्कतेमुळे उघड झाला आहे. प्रशासनाने लाखो लिटर बनावट तूप जप्त केले असून भेसळ करणाऱ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु आहे.नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेला हा खेळ पोलिस आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाने उघड केला आहे.