राहुल गांधीच्या नेतृत्वात गुजरातचा निकाल कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक – अशोक चव्हाण

मुंबई : पंतप्रधानांसह निम्मे केंद्रीय मंत्रीमंडळ, १३ राज्यांचे मुख्यमंत्री, मदतीला सरकारी यंत्रणा आणि प्रशासन या सर्वांविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी गुजरातचा निकाल उत्साहवर्धक असून गुजरातमध्ये भाजपचा नैतिक पराजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

bagdure

पंतप्रधानापासून भाजप अध्यक्षापर्यंत अनेक मंत्री व भाजप नेत्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन काँग्रेस अध्यक्ष आणि नेत्यांवर केलेली टीका, गलिच्छ प्रचार, पोलीस, प्रशासनाला हाताशी धरून निवडणुका जिंकण्यासाठी केलेल्या डर्टी ट्रिक्स यामुळे १५० जागा जिंकण्याच्या वल्गना करणा-या भाजपाला तीन अंकी आकडा ही गाठता आलेला नाही.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. या निवडणुकीमध्ये राहूल गांधी एक लढवय्या योध्दा म्हणून समोर आले आहेत. हा निकाल देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक असून आगामी राज्य आणि देश पातळीवरील निवडणुकांमध्ये राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भाजपला पराभवाची धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असे खा. चव्हाण यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...