…तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका

नवी दिल्ली : कारोना रुग्ण संख्येच्या वाढीबाबत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सध्या भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी अनेक देश धावले आहेत. अनेक देशांमधून आरोग्य साहित्य भारताला मिळत आहे. मात्र, मोदी सरकारने त्यांचे काम केले असते तर ही वेळच आली नसती अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

या संबंधी राहुल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केलीय. राहुल यांनी लिहिले की, ‘विदेशी मदत मिळण्यावर केंद्र सरकार वारंवार स्वत:ची छाती ठाेकत असून हे निराशाजनक आहे. जर मोदी सरकारने त्यांचे काम केले असते तर, ही वेळच आली नसती.’

भारतात कोरोना रुग्ण संख्या वाढण्याला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी या आधी देखील केला होता. विदेशातून मतद मागण्याची वेळ भारतावर आलीच नसती, असेही राहुल यांनी म्हटले आहे. युरोप अमेरिकेसह भारतातील शेजारी देशांनीही भारताला मदत केली आहे. यामध्ये चीनकडूनही भारत मदत स्विकारत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP