fbpx

बाळासाहेबांचा जीवनप्रवास उलगडणार हिंदीतून

balasaheb

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर हिंदी चित्रपट येत असून बाळासाहेबांचे नातू राहुल ठाकरे हा चित्रपट करणार आहेत . त्याची माहिती त्यांनी दसऱ्याला फेसबुकवर टीझर पोस्टर रिलीज करून दिली.

राहुल ठाकरे यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘बाळासाहेब ठाकरे’ असून, ते स्वतः चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. हिंदीतले एक आणि मराठीतले एक असे दोन प्रख्यात लेखकही या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण करणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे.

balasaheb-thakerey-teaser

राहुल ठाकरे यांचा अल्प परिचय

राहुल ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत. बाळासाहेबांचे मधले चिरंजीव जयदेव आणि त्यांच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे यांचे राहुल हे सुपुत्र आहेत. त्यांनी कॅनडात फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं आहे. आमिर खानच्या पीके चित्रपटासाठी त्यांनी राजू हिरानी यांचा सहाय्यक म्हणूनही काम पाहिलं होतं. राहुल यांनी आता आपल्या लाडक्या आजोबांवर म्हणजे बाळासाहेबांवर बायोपिक बनवण्याचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला आहे.