Share

Rahul Shevale | “उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेव्हा…” ; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

मुंबई : शिवसेना पक्षाची परंपरा असलेला दसरा मेळावा आज दोन ठिकाणी पार पडत आहे. आजचा मेळावा ५६वा दसरा मेळावा असून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी याचं आयोजन केलं आहे. या दोन्ही मेळाव्यांमध्ये नेत्यांच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असतानाच राहुल शेवाळे यांनी वक्तव्य केलं आहे.

राहुल शेवाळे यांचं भाषण :

बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडला, जाण्याचे कारस्थान रचले जात होते, असा आरोप आदित्य ठाकरेंनी आमच्यावर केले होते, असं शेवाळे म्हणाले. तसेच जेव्हा उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेव्हा टीका करणारे स्वत: (आदित्य ठाकरे) स्विझर्लंड येथे व्यापारी परिषदेला गेले होते. त्यांचा विभाग नसताना ते गेले होते. जेव्हा जून महिना यायचा तेव्हा ठाकरे इंग्लंडला जायचे. आम्ही इथे नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत असायचो, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

मला स्वप्नातही वाटलं नाही की, मी राहुल रमेश शेवाळे याला या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळेल. मी राहुल रमेश शेवाळे या नावाचा वापर वारंवार करत आहे, कारण मी कुणाचा बाप चोरलेला नाही. माझं नाव राहुल रमेश शेवाळे आहे. माझे वडील रमेश संभाजी शेवाळे हे होते, हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. कारण वारंवार आमच्यावर आरोप होतो की माझा बाप चोरला, असं शेवाळे म्हणाले.

दरम्यान, शेवाळे यांनी महाभारताचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांचं समर्थन केलं आहे. यावेळी त्यांची भगवदगीतेचा देखील उल्लेख केला आहे.

बीकेसी मैदानावर साजरा होत असलेल्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली आहे. त्याबरोबरच बाजूला चरणसिंग थापा उभे राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. चरणसिंग थापा हे स्व.बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जातात. काही दिवसांपूर्वीच चरण सिंग थापा यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे

दरम्यान , शिवतीर्थावर लांबून लोक स्वतःच्या खर्चाने पोहचले असून आपल्यासोबत भाकरी देखील घेऊन आले आहेत. एवढंच नाही उद्धव ठाकरे हेच आम्हा शेतकऱ्यांचे खरे नेते असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी लोकं उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : शिवसेना पक्षाची परंपरा असलेला दसरा मेळावा आज दोन ठिकाणी पार पडत आहे. आजचा मेळावा ५६वा दसरा मेळावा असून …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now