Share

Rahul Narvekar | “जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का?”; राहुल नार्वेकर म्हणाले,

Rahul Narvekar | मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाड यांना अटकदेखील झाली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

दरम्यान, नुकतंच दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट करत पोलिसांनी आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केलं असल्याचा आरोप करत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. त्यांनतर त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आव्हाडांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.

नार्वेकर म्हणाले, आतापर्यंत माझ्याकडे जितेंद्र आव्हाड किंवा इतर कोणत्याही विधिमंडळ सदस्याचा राजीनामा आलेला नाही. एखाद्या आमादाराला राजीनामा द्यायचा असेल तर तो विधिमंडळ अध्यक्षांना दिला जातो. जितेंद्र आव्हाड मागील १५ ते २० वर्षे विधिमंडळात काम करत आहेत. त्यामुळे राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे द्यायचा, याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे.

तसेच राजीनामा स्वीकारण्यापूर्वी पडताळणी करावी लागते. राजीनामा देण्याची कार्यपद्धती, नियम असतात. या सर्वांचे पालन झाले आहे का? हे पाहावे लागते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर राजीनामा स्वीकारायचा की नाही, हे ठरवले जाते, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली. एखादी व्यक्ती निर्दोष असेल तर तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. सर्वांसाठी कायदा समान आहे, असंही राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या :

Rahul Narvekar | मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now