रासपतून हकालपट्टी, जानकरांच्या निर्णयावर राहुल कुल म्हणतात… 

टीम महाराष्ट्र देशा : महायुतीकडून दौंड व जिंतूर मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडण्यात आला आहे. भाजप श्रेष्ठींच्या आदेशानुसार दौंड मतदारसंघाचे रासपचे उमेदवार राहुल कुल यांनी कमळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर जिंतूर मतदारसंघाच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांनीही कमळ चिन्ह स्वीकारले आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी यावर नाराजी व्यक्त करत बोर्डीकर आणि कुल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

यावर राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पक्षातून हकालपट्टी केल्याचा निर्णय आपल्याला मान्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर या दोघांमध्ये याबद्दल अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे बैठकीनंतर त्यांच्याकडून जसे निर्देश मिळतील त्यानुसार आपण निर्णय घेऊ. तसेच रासपकडून होण्तेही अधिकृत पत्र आलेलं नाही, मात्र रासप महायुतीतच असल्याने अडचण येणार नाही राहुल कुल म्हणाले आहेत.

जागावाटपात मित्र पक्षांसाठी सोडण्यात आलेल्या जागांमुळे महादेव जानकर आणि रामदास आठवले नाराज आहेत. याविषयी बोलताना जानकर यांनी ‘भाजप बरोबर येऊन चांगलाचं फसलो असल्याचे वक्तव्य केले आहे. भाजपने बोलल्याप्रमाणे मित्रपक्षांना जागा न दिल्याने मित्रपक्ष नाराज आहेत. त्यातचं भाजप मित्र पक्षांना कमळ चिन्हावर लढण्यास सांगत असल्यने महादेव जानकर यांनी भाजप बरोबर येऊन पस्तावत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या