धनादेश न वटल्याने राहुल कुल यांच्याविरुद्ध वॉरंट

टीम महाराष्ट्र देशा : स्टेट बँकेच्या कर्ज परतफेडपोटी दिलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश न वटल्या प्रकरणी समन्स बजावून ही न्यायालयात हजर न राहिल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह इतर तीन जणांना दौंड न्यायालयाने वॉरंट बजावले.

आमदार राहुल कुल हे २००१ पासून सलग पाटण साखर कारखान्याच अध्यक्षपद भूषवत आहेत. कारखान्याने काही दिवसापूर्वी स्टेट बँकेकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड म्हणून कारखान्याने चेक दिला होता. मात्र, खात्यात पैसे नसल्याने तो चेक वटला नाही. त्यामुळे बँकेची फसवणूक झाली या हेतूने बँक व्यवस्थापकांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता धनादेश न वटल्याने राहुल कुल यांच्याविरुद्ध वारांत निघाले