मोठा राजकीय खल झाला पण अखेर ‘त्या’ निर्णयावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झालीच – कुल

टीम महाराष्ट्र देशा : दौंड तालुक्‍यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालयाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता, या मागणीला यश आले असून, दौंडसाठी सरकारने स्वतंत्र प्रांत कार्यालय मंजूर केले आहे, यावर मुख्यमंत्र्याची स्वाक्षरीही झाली आहे, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.

प्रांत कार्यालय दौंडला आणण्यावरून मोठा राजकीय खल झाला आहे. त्यानंतरही हे कार्यालय पुरंदरला गेल्याने या चुकीच्या निर्णयाचा फटका दौंडकरांना बसत आहे. यामुळे दौंडकरिता स्वतंत्र प्रांत कार्यालय असावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अस राहुल कुल यांनी सांगितलं आहे.

याबाबत शासनाकडे पाठपुरावा कायम होता. याला आता यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. दौंडकरिता स्वतंत्र प्रांतकार्यालय मंजूर झाले असून, यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. आता, फक्‍त पदनिर्मिती व कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया बाकी आहे. तेही काम आगामी काळात लवकरच होईल, असेही आमदार कुल यांनी सांगितले.

मोदी-शहांनी ‘या’ नेत्याच्या खांद्यावर दिली महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची धुरा

#महापूर : पूरग्रस्तांसाठी अर्ध्याचं तासात शरद पवारांनी जमवेल १ कोटी रुपये

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? आपत्तीतही सुरु आहे फडणवीस सरकारची जाहिरातबाजी