राहुल जगताप की बबनराव पाचपुते; श्रीगोंद्यातून कोण मारणार बाजी ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांना महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात होणार असली तरी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Loading...

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राहुल जगताप आणि भाजपचे बबनराव पाचपुते यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांचा निसटता पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती यंदा होणार नाही याची काळजी पाचपुते नक्कीच घेतील यात शंका नाही. त्यानुसार त्यांनी प्रयत्नदेखील सुरु केले आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत ते सुजय विखे यांचा प्रचार करत होते त्यामुळे त्यांना विधानसभेत याचा फायदा पाचपुते यांना नक्कीच होणार आहे.

दुसरीकडे विद्यमान आमदार राहुल जगताप यांचा जनसंपर्क कमी झाल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. तसेच गेल्या ५ वर्षात जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करण्यास त्यांना अपयश आलं असल्याचही बोललं जात आहे. त्यामुळे यंदा होणारी ही निवडणूक राहुल जगताप यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

दरम्यान, विधानसभेसाठी राजेंद्र नागवडे यांचेही नाव चर्चेत आहे. जर राजेंद्र नागवडे यांनी निवडणूक लाढवल्यास राहुल जगताप यांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.Loading…


Loading…

Loading...