राहुल गांधींच्या नेतृत्वात देशाला अच्छे दिन येतील – अशोक चव्हाण

rahul gandhi vs ashok chavan

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेसच्या नेतृत्वाने आजवर केवळ पक्षाकरिता नाही तर देशहितासाठी योगदान दिले आहे. अनेक कॉंग्रेस नेत्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. याच परंपरेला शोभणारे नेतृत्व राहुल गांधीच्या रूपाने कॉंग्रेसने देशाला दिले असून त्यांच्या नेतृत्वात देशाला खऱ्या अर्थाने अच्छे दिन येतील असा विश्वास कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांची आज कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर चव्हाण बोलत होते.

सध्या सत्तेवर असणारे लोक जनतेची दिशाभूल आणि खोटे बोलणारे आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडण धोक्यात आली असून देशाचा नैतिक पाया ढासळत चालला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न आज देशासमोर उभे आहेत. मात्र राहुल गांधी या आव्हानांना सक्षमपणे समोर जाणारे आणि समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारे असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले.

Loading...