गुजरातचा आश्चर्यकारक निकाल लागणार – राहुल गांधी

राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा: गुजरातमध्ये आश्चर्यकारक निकाल लागणार असून आम्ही विजयी होणार असल्याचा दावा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. अहमदाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केलीय. गेल्या २२ वर्षात मोदी आणि रूपांनी यांनी काहीच लोकांच भल केल असून जवळपास ९० टक्के शाळांचं खासगीकरण करण्यात आल्याची टीका राहुल यांनी केली आहे. तसेच गुजरातमध्ये निवडून आल्यावर सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि युवकांना रोजगार उपलब्द करून दिला जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान गुजरातमधील प्रचार दौऱ्यावेळी राहुल गांधी हे अनेक मंदिरांमध्ये जावून दर्शन घेत आहेत. मात्र आपण आधीपासूनच मंदिरात जातो. मंदिरात जात नाही हा भाजपकडून अपप्रचार केला जात असल्याचेही ते म्हणाले.

2 Comments

Click here to post a comment