१७ दिवसांनी देशात परतल्यानंतर राहुल गांधींचा तामीळनाडु दौरा…

राहुल गांधीं

नवी दिल्ली: सध्या देशात एकीकडे कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांच आंदोलन गेल्या दीड महिन्यापासून कायम आहे तर दुसरीकडे देशातील पाच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांचे देखील तयारी सुरू आहे. या दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी बुधवारी म्हणजे आज इटली वरून भारतात परत येत आहेत. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गुरुवारी ते सक्रिय होणार असल्याच सांगण्यात येत आहे.

देशातील देशातील पाच राज्यांमध्ये येत्या वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून प्रचार मोहिमा आखल्या जात असताना काँग्रेसकडून देखील आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुका आणि तामिळनाडूतील पारंपारिक सण पोंगलच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते मदुराईचा दौरा करतील.

शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधी यांनी वेळोवेळी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. मात्र या दरम्यान ते विदेश दौर्यावर गेल्याने भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तर राहुल गांधी यांचा हा दौरा  वैयक्तिक आहे.  यावर कोणतीही टीका-टिप्पणी करण्यात येऊ नये असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून यावेळी देण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या