राहुल गांधींचे ‘ते’ वक्तव्य चूकीचं’; फ्रान्स सरकारच्या खुलाश्याने राहुल गांधी तोंडघशी

rahul_gandhi

टीम महाराष्ट्र देशा – राफेल खरेदीबाबत भाजप सरकारवर टीका करणारे राहुल गांधी चांगलेच तोंडघशी पडल्याचं चित्र आहे. मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटून याबाबत माहिती विचारली असता असा कोणताही करार झाला नसल्याचे राहुल गांधीनी छातीठोकपणे सांगितले. मात्र,राफेल कराराबाबत कोणतीही गोष्ट उघड केली नसल्याचा खुलासा फ्रांस सरकारने केला आहे.

मोदी सरकारविरोधात लोकसभेत सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मंत्र्यांवर खोटे आरोप करून सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत भाजपाने राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राफेल करार गोपनीय आहे आणि राफेल कराराबाबत कोणतीही गोष्ट उघड केली नसल्याचा खुलासा फ्रांस सरकारने केला आहे.

भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये गुप्ततेचा करार 25 जानेवारी 2008 साली काँग्रेसचे मंत्री ए. के. अँटनी यांनीच केला होता. असे सांगत निर्मला सीतारामन यांनी फ्रान्सबरोबर झालेल्या कराराची प्रत दाखवत ए. के. अँटनी यांची स्वाक्षरीही दाखविली. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी एका भारतीय माध्यमाला मुलाखत देताना कराराची माहिती देता येणार नसल्याचा दाखलाही त्यांनी दिला. राहुल गांधी यांनी असत्य विधान करत आपल्यावर आरोप केला असेही सीतारामन यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राफेल विमानाच्या खरेदीमध्येही घोटाळा झाला असून, मोदी सरकारच्या काळात अचानक प्रत्येक विमानाची रक्कम 500 कोटीवरुन 1600 कोटी रुपये झाली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या विमानाची किंमत सांगण्यास नकार दिला. फ्रान्स आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या करारामुळे माहिती देता येत नाही असे त्यांनी सांगितले होते. मात्र मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटून याबाबत माहिती विचारली असता असा कोणताही करार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निर्मला सीतारामन खोटे बोलल्या आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्र्यांवर केला. यावर संरक्षण मंत्री सीतारामन आणि भाजपाच्या खासदारांनी विरोध केला आणि आक्षेप घेतला.