माफीनाम्यानंतर देखील राहुल गांधी म्हणतात चौकीदार चोर आहे की नाही, हे आता जनताच ठरवेल

टीम महाराष्ट्र देशा : ‘चौकीदार चोर है’ हे न्यायालयानंही मान्य केलंय, असं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावली होती. या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्या,’ असे आदेश न्यायालयानं दिले होते. अखेर राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’वरून सुप्रीम कोर्टाबाबत केलेल्या दाव्यावर अखेर माफी मागितली आहे.

मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर आता सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवत २२ एप्रिलपर्यंत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे. ‘निवडणुकीच्या धामधुमीत मी ते वक्तव्य केलं होतं. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं आहे.

मात्र, यानंतर देखील राहुल गांधी यांची धूळफेक सुरूच असून ट्विट करत आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, २३ मे रोजी कमळछाप चौकीदार चोर आहे किंवा नाही, याचा फैसला जनतेच्या न्यायालयातच होईल. हा न्याय होईलच. गरिबांकडून पैसे लुटून श्रीमंतांना देणाऱ्या चौकीदाराला शिक्षा मिळेल, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.Loading…
Loading...