fbpx

मुख्यमंत्री निवडीसाठी राहुल गांधीची फोटो डिप्लोमसी

राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला तीन राज्यात सत्ता मिळाली पण मुख्यमंत्री निवडण्यात मात्र राहुल गांधी यांची चांगलीच दमछाक झाली. परंतु यामध्ये राहुल गांधी यांच्या फोटो डिप्लोमसीची मात्र चांगलीच चर्चा झाली. राहुल गांधी यांनी तिन्ही राज्यात मुख्यमंत्री निवडताना प्रमुख दावेदारासोबत फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.


राजस्थान मध्ये प्रमुख दावेदार असणाऱ्या अशोक गेहलोत आणि सचिन पायलट याच्यासोबत फोटो शेअर केला होता. त्यानंतर मध्यप्रदेशमधील मुख्यमंत्री पदाचे दावेदार कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सोबतचा फोटो देखील त्यांनी शेअर केला होता.


छत्तीसगड मध्ये तर मुख्यमंत्री पदाचे चार-चार दावेदार होते. ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल, चरण दास महंत, त्रिभुनेश्वर शरण सिंहदेव हे छत्तीसगड मधील दावेदार होता. राहुल गांधी यांनी त्यांच्या सोबतचा फोटो देखील शेअर केला होता. राहुल गांधी यांच्या या फोटो डिप्लोमसीची सध्या चांगलीच चर्चा दिसते आहे.