राहुल गांधी हरवले आहेत , शोधून देणाऱ्यास बक्षीस जाहीर …

rahul-gandhi

वेबटीम : पोस्टर्सच्या माध्यमातून राजकीय वार करण्याची पुण्यातील राजकारणाची पद्धत आता व्यापक बनत चालली असून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता असल्याच्या आशयाचे पोस्टर अमेठी मतदार संघात लावण्यात आल्या आहेत.
अमेठी या राहुल गांधींच्या मतदार संघात अज्ञात व्यक्तींनी काही पोस्टर लावले आहेत ज्यात राहुल गांधी बेपत्ता असल्याचं म्हटलं आहे.अमेठी मध्ये सर्व मोक्याच्या ठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

काय म्हटलं आहे या पोस्टर्स मध्ये

राहुल गांधी बेपत्ता असल्यामुळे अमेठीचा विकास ठप्प झाला आहे.त्यांच्या अशा वागण्याने अमेठीतील जनता फसवणूक झाल्याची तसेच अपमानित झाल्याचा अनुभव घेत आहे.जो कोणी व्यक्ती राहुल गांधी यांची माहिती देईल त्याला योग्य इनाम देण्यात येईल
अमेठीतील सामान्य जनता

हे तर राजकीय षडयंत्र :काँग्रेस
जे पोटर्स लावण्यात आले आहेत ते आर एस एस आणि भाजपची राजकीय चाल असल्याचा आरोप काँग्रेस कडून करण्यात आला आहे.यापूर्वी देखील अशाच पद्धतीने षडयंत्र करण्यात आली आहे याविरोधात आम्ही आता पोलिसांकडे तक्रार नोंदवणार आहोत.

योगेंद्र मिश्र (काँग्रेस नेते)

भाजपने फेटाळले आरोप
भाजप तसेच आर एस एस च या प्रकरणाशी काहीही घेणेदेणे नसून राहुल गांधी यांनी जर आपल्या मतदार संघासाठी काही केलं असतं तर ही वेळ त्यांच्या वर आली नसती

उमाशंकर पांडे (भाजप नेते)