उत्तराखंड : भाजपचे राष्ट्राय अध्यक्ष जे. पी. नड्डा सध्या प्रचारासाठी उत्तराखंडमध्ये आहेत. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कठोर शब्दात टीका केली आहे. ते म्हणालेत की राहुल गांधी मर्यादित बुद्धीचे आहेत. ‘राहुल गांधी म्हणतात की बंदूक, हेलिकॉप्टर, लढाऊ विमानं खरेदी केल्यामुळे देश मजबूत होत नाही. अशी वक्तव्ये ऐकून मला चिंता वाटायला लागते. माझा मेंदू अडचणीत येतो. हे काय बोल आहेत? काय विचार करत आहेत? मी तर एवढंच म्हणेल की राहुल गांधी मर्यादित बुद्धीचे आहेत.’
‘ही हत्यारे का खरेदी केली जात आहेत, यामुळे देश मजबूत होत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. पण त्यांचे माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी राज्यसभेत म्हणालेत की पाकिस्तानमधील पायाभूत सोयीसुविधा भारतापेक्षा चांगल्या आहेत आणि आपण यावर लक्ष दिले नाही. त्यांना हे मान्य करायला अजिबात लाज वाटत नाही. तुम्हाला लाज वाटेल तरी कशी? तुम्ही कामंच अशी केली आहेत,’ असे देखील नड्डा म्हणाले. राहुल गांधीनी संसदेत भाजपच्या एकंदरीत धोरणावर टीका केली होती. फक्त हत्यारे घेतल्याने देश मजबूत होत नाही असे त्यांचे म्हणणे होते.
पुढे नड्डांनी मोदी सरकारने केलेले संरक्षण करारांची आठवण ही करून दिली. राहुल गांधींनी लोकसभेमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपावर कठोर शब्दांमध्ये टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून परखड शब्दांत हल्ला करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लोकसभा आणि राज्यसभेतील भाषणात राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यात देशात पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<