fbpx

राहुल गांधींची घोषणा; काँग्रेसची सत्ता आल्यास १० लाख युवकांना रोजगार देणार

टीम महारष्ट्र देशा : दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत काँग्रेस पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. कॉंग्रेसच्या या जाहीरनाम्याला ‘जन आवाज’ असे नाव देण्यात आले आहे. ‘हम निभाएंगे’ असे म्हणत काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला.

देशात जर कॉंग्रेसची सत्ता आली तर १० लाख युवकांना रोजगार मिळेल तसेच ६ महिन्यांच्या आत २२ लाख सरकारी निर्माण करू अशी घोषणा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज केली. कॉंग्रेसच्या या घोषणेमुळे बेरोजगार तरुणांच्या मनात नवीन आशा निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी गरीबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये जमा करू अशी घोषणा करण्यात आली होती आजही त्या घोषणेची पुनरावृत्ती करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. या जाहीरमान्यात रोजगाराचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला, मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.