प्रियांका गांधीच्या एन्ट्रीमुळे भाजप भयभीत झालंं आहे, राहुल गांधींचे टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा : ‘मी खूप खुश आहे. कारण, प्रियांका माझ्यासोबत काम करणार आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण बदलण्यासाठी आम्हाला तरुण नेतृत्वाची गरज होती. प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे शक्तिशाली नेते आहेत’, अशी प्रतिक्रिया देवून राहुल गांधी यांनी प्रियांका गांधींचे राजकारणात स्वागत केले आहे. तसेच प्रियांका गांधी पुन्हा राजकारणात आल्यामुळे भारतीय जनता पार्टी(भाजपा) भयभीत झाली आहे, असा टोला देखील राहुल गांधींनी लगावला आहे.

कॉंग्रेस म्हंटल की गांधी घराण्याच नाव अग्रेसर असत आता आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या पाठोपाठ प्रियांका गांधी देखील सक्रीय राजकारणात दिसणार आहेत. त्यांच्यावर पक्षाने उत्तरप्रदेशच्या सरचिटणीसपदाची जवाबदारी दिली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचा हा मोठा निर्णय असल्याच म्हंटल जात आहे.

Loading...

दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यामुळे गांधी कुटुंबाचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते भयंकर खुश झाले आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांनी या निवडीबाबत बोलताना म्हटलंय की या निवडीचा फक्त त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडच्या भागावरच परीणाम होणार नसून संपूर्ण देशभरात फरक पडेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा