जनतेचा विश्वास परत मिळवू- राहुल गांधी

rahul_gandhi

टीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरा ,मेघालय आणि नागालॅंडचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निकालावर भाष्य केलं आहे. जनमताचा आपण आदर करत असून त्यांचा विश्वास आपण परत मिळवू असं वक्तव्य गांधी यांनी केलं आहे.

शनिवारी इशान्य भारतातल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड या तीन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात त्रिपुरात काँग्रेसला अतिशय मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे.त्रिपुरामध्ये आपलं खातंही कॉंग्रेसला उघडता आलं नाही तर नागालॅंडमध्ये सरळ पराभवाचा सामना करावा लागला. मेघालयमध्ये कांग्रेसला 2013 साली 29 जागा मिळाल्या होत्या यंदा मात्र 21च जागा मिळाल्या आणि तरीही काँग्रेसला सत्ता काही स्थापन करता आली नाही.

सुरुवातीला काही दिवस प्रचारासाठी फिरणारे राहुल गांधी शेवटच्या क्षणी यासर्व घडामोडी होत असताना कुठेच दिसले नाहीत. अश्या निर्णायक क्षणी आपला नेता कुठे आहे असा सवाल सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात विचारला जात होता. राहुल गांधी सध्या इटली मध्ये असून निकालाच्या दिवशी आपल्या 93वर्षाच्या आजीला भेटायला आणि सरप्राईज देण्यासाठी इटलीला गेले होते. त्यानंतर तब्बल दोन दिवसांनी त्यांनी या पराभवावर भाष्य केलं आहे.