राहुल गांधीच्या ७० हजार रुपयांच्या जॅकेट वरून भाजपचे टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा: राजकीय नेत्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून सुद्धा राजकरण होत असते. मग तो नरेंद्र मोदींच्या सूट असो किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांचे जॅकेट. मेघालय निवडणुकीच्या काही दिवस आधी शिलाँगला पोहोचलेले राहुल गांधी यांनी ७० हजार रूपये किंमतीचे जॅकेट परिधान केल्यामुळे निवडणुकीच्या प्रचारावेळी एका सभेत आपला फाटलेला खिसा दाखवणाऱ्या राहुल गांधींनी इतका महाग जॅकेट घालण्यावरून भाजपाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

bagdure

भाजपने ट्विट करत राहुल गांधींच्या जॅकेटवर निशाणा साधला आहे. व्यापक भ्रष्ट्राचार करून मेघालयचा सरकारी खजिना लुटल्यानंतर काळ्या पैशातून बनलेले सुटा-बुटाचे सरकार ? आमच्या दु:खावर गाणे गाण्याऐवजी तुम्ही मेघालयच्या नाकर्त्या सरकारचे प्रगती पुस्तक देऊ शकला असता. तुमची उदासीनता आमची थट्टा उडवत आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजपने जॅकेटचा फोटो आणि किंमतही पोस्ट केली आहे. हुल गांधी यांनी यापूर्वी सुटा-बुटाचे सरकार असा आरोप केला होता. भाजपाने या ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधींना उत्तर दिल्याचे सांगण्यात येते.

You might also like
Comments
Loading...