राहुल गांधींचा वायनाड मधून उमेदवारी अर्ज दाखल, रोड शोच्या दरम्यान अपघात

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज वायनाड येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अर्ज दाखल केल्यानंतर रोड शोला सुरवात झाली आणि अचानक एक अपघात घडला या अपघात काही पत्रकार जखमी झाले. हे राहुल गांधींच्या लक्षात येताच राहुल गांधींनी स्वतः त्या पत्रकारांना मदतीचा हात देत अम्ब्युलंस पर्यंत घेवून गेले.या घटने मुळे राहुल गांधी च्या माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

यावेळी झाल अस की, राहुल गांधी यांचा रोड शो देखील काढण्यात आला होता. यावेळी त्यांच्या या रोड शोला प्रचंड गर्दी होती. या रोड शोचं रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांच्या ट्रकवरील बॅरिकेट तुटलं आणि काही पत्रकार जखमी झाले.ही बाब प्रियांका गांधींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुल गांधींना याबाबत सांगितलं. राहुल गांधींनी तातडीने आपला ताफा थांबवला आणि पत्रकारांपर्यंत पोहोचून त्यांची विचारपूस केली. यानंतर पत्रकारांना आधार देत राहुल गांधींनी स्वत: त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत नेलं आणि मग ते आपल्या गाडीत जाऊन बसले.

दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे आपल्या अमेठी या पारंपारिक मतदार संघासोबत केरळ मधूल वायनाड येथील मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज अनेक कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीत दाखल केला. वायनाडमध्ये एनडीएचे उमेदवार तुषार वेल्लापल्ली यांच्यासोबत राहुल गांधींची मुख्य लढत होणार आहे. तुषार वेल्लापल्ली हे भारत धर्म जन सेनेचे (बीडीजेएस) अध्यक्ष आहेत. केरळमध्ये भाजप आणि बीडीजेएस यांची आघाडी आहेत.