राहुल गांधी आता प्रौढांसाठी फ्री सेक्सचीही घोषणा करतील – मधुपुर्णिमा किश्वर

टीम महारष्ट्र देशा :निवडणुका जवळ आल्या की अनेक राजकीय पक्ष जनतेवर आश्वासनांचा आणि घोषणांचा वर्षाव करतात. तसेच आम्ही किती इतरांपेक्षा उजवे आहोत हे सिद्ध करत असतात. त्याच अनुषंगाने काँग्रेसकडून देखील अशाच घोषणा जाहीर सभांमधून होत आहेत. कॉंग्रेसच्या म्हणजेच राहुल गाधींच्या या घोषणाबाजीचा खरपूस समाचार मधुपूर्णिमा किश्वर यांनी घेतला आहे. राहुल गांधी आता प्रौढांसाठी फ्री सेक्सचीही घोषणा करतील, असे किश्वर यांनी ट्विट केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी देशभर कॉंग्रेस पक्षाची बांधणी करत आहेत. पक्षबांधणी करताना राहुल गांधी जाहीरसभांमधून विविध योजना देण्याच्या घोषणा करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मधुपूर्णिमा किश्वर यांनी ‘थोडं थांबा, राहुल गांधी प्रौढांसाठी मोफत सेक्सचीही लवकरच घोषणा करतील. प्रत्येक पुरुषाला वर्षातून ठराविक दिवस फ्री सेक्स देण्याची घोषणा राहुल गांधींकडून होईल’, अशा आशयाच ट्विटवरून एक वादग्रस्त ट्वीट केले आहे.

मधुपुर्णिमा किश्वर या दिल्लीत प्राध्यापक असून ह्युमन राईट संघटनेच्या संस्थापक आहेत.