२०१९ च्या निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखालीच !

नवी दिल्ली : राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ऑक्टोबरलाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबईतील बैठतीत ठराव मंजूर केला होता, ज्यामध्ये राहुल गांधींकडे काँग्रेसचं अध्यक्षपद देण्याची मागणी केली होती.

त्यानंतर आता ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येतील असं म्हटलं आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डॉ. मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. 

राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद देऊन देशभरातील काँग्रेस नेत्यांची इच्छा कधी पूर्ण होऊन, राहुल गांधी कधी पक्षाची धुरा खांद्यावर घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 Loading…
Loading...