fbpx

लोकसभा निवडणुकीनंतर चौकीदाराची चौकशी होईल : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. सर्वच राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तर काही नेते जनतेला आश्वासनं देण्यात गुंग आहेत. असंच एक आश्वासनं कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे.

गुरुवारी नागपूर येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘तुम्ही गरीब किंवा कष्टकऱ्यांच्या घराबाहेर चौकीदार उभा राहिल्याचे कधी पाहिले आहे का? मात्र, अनिल अंबानी यांच्या घराबाहेर हजारो चौकीदार उभे आहेत. आपल्याकडून जे काही चोरले आहे, त्याची राखण हे चौकीदार करत आहेत’.अशी टीका त्यांनी मोदींवर केली. सामान्य जनता मात्र ‘अच्छे दिन’ येतील अशी आशा लावून बसले आहेत असं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे.

तसेच या चौकीदाराने केलेला घोटाळा हा काही लहानसहान नाही. लोकसभा निवडणुकीनंतर या सगळ्याची चौकशी होईल असं आश्वासनं राहुल गांधी यांनी जनतेला दिलं आहे.